हे काय नवं? भारतीय रेल्वेतही विमानाप्रमाणं मर्यादित वजनाच्या सामानालाच परवानगी
रेल्वे प्रवासाला निघालेली एखादी व्यक्ती आणि त्याचवेळी विमान प्रवासासाठी निघालेली व्यक्ती या दोघांचंही सामान पाहिल्यास तुम्हाला तफावत लक्षात येईल.
आतापर्यंत रेल्वे प्रवासादरम्यान अनेकजण शक्य होईल तितकं सामान सोबत नेत होते. पण, आता मात्र तसं करता येणार नाहीये.
रेल्वेच्या नव्या नियमावलीनुसार स्लीपर कोचचं तिकीट असणाऱ्या व्यक्तीला 40 किलो इतकं सामान नेता येणार आहे. Informal Newz नं ही माहिती दिली.
AC two tier च्या प्रवाशांना 50 किलो सामान नेण्याची परवानगी आहे. तर, AC प्रथम श्रेणी अर्थात फर्स्ट क्लासनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना 70 किलो वजनी सामान नेता येणार आहे.
रेल्वेचा हा नियम लागू होण्यापूर्वी प्रवासी भरमसाट सामान सोबत नेत होते. पण, आता मात्र एखाद्या ठिकाणी जायचं झाल्यास त्यांना असं करता येणार नाही.
रेल्वेची नवी नियमावली विमान प्रवासाशी काही अंशी साधर्म्य साधणारी आहे. जिथं आता प्रवाशांना सामानाच्या वजनाची मर्यादा पाळावी लागणार आहे.