Indian Railways: रेल्वेच्या नियमानुसार, तुम्ही तुमचे तिकीट रद्द न करता प्रवासाची तारीख बदलू शकता, त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
भारतीय रेल्वेने दररोज लाखो लोक प्रवास करतात. प्रवास सुखकर करण्यासाठी रेल्वेने काही नियम केले आहेत. यापैकी एक नियम जाणून घेऊया.
प्रवासासाठी आपण आधीच तिकीट बुक करतो पण प्रवासाची वेळ जवळ आली की नियोजन बदलते आणि तिकीट रद्द करावे लागते.
पण तुम्ही रेल्वे तिकीट रद्द न करता प्रवासाची वेळ बदलू शकता. कन्फर्म तिकिटावर तुमच्या प्रवासाची तारीख बदलता येईल.
पण तुम्ही रेल्वे तिकीट रद्द न करता प्रवासाची वेळ बदलू शकता. कन्फर्म तिकिटावर तुमच्या प्रवासाची तारीख बदलता येईल.
यासाठी तुम्हाला ट्रेन सुटण्याच्या 48 तास आधी आरक्षण काउंटरवर तुमचे तिकीट सरेंडर करावे लागेल.
तसेच तुम्हाला नवीन तारखेसाठी अर्ज करावा लागेल. येथे तुम्हाला क्लास अपग्रेड करण्याचा पर्याय देखील मिळेल.
अर्ज प्राप्त झाल्यानंतर, तुमच्या प्रवासाची तारीख आणि क्लास दोन्ही बदलले जातील.
तारीख बदलण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. मात्र वर्ग बदलल्यास त्या वर्गाच्या भाड्याच्या आधारे पैसे आकारले जातील.
या सोप्या पद्धतीने तुम्ही प्रवासाची तारीख बदलू शकता आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागणार नाही.