देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातील भाग रेल्वेच्या माध्यमातून जोडला गेला आहे. अशा या रेल्वेकडून प्रवाशांसाठी अनेक सुविधा पुरवल्या जातात.
मागील काही वर्षांमध्ये रेल्वेनं एसी रेल्वेंची संख्या वाढवली असून, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये या कोचमधून प्रवास करणाऱ्यांचा आकडा तुलनेनं मोठा असतो.
रेल्वे प्रवास करत असताना अनेकांनाच आकर्षण असतं ते म्हणजे एसीच्या फर्स्ट क्लास कोचचं. तिथं असं नेमकं खास असतं तरी काय, हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करून असतो.
फर्स्ट क्लास, फर्स्ट एसी कोचची तिकीट इतर कोचच्या तुलनेत महाग असते. या कोचमध्ये खासगी जागा असून, आसनक्षमता कमी असते.
प्रायव्हसीच्या कारणास्तव या कोचमध्ये आसनांना प्रवेशद्वारंही असतात. या आसनांवरील प्रवाशांसाठीचं जेवण रेल्वेतच तयार केलं जातं.
इतर डब्यांच्या तुलनेत फर्स्ट क्लास एसी कोचच्या सीट अधिक मोठ्या, रुंद आणि आरामदायी असतात.
या कोचमध्ये दिल्या जाणाऱ्या सर्व सुविधांची रक्कम प्रवासी तिकीटामध्ये समाविष्ट केलेली असते.