आता तुम्ही घरबसल्यादेखील रेशन कार्डसाठी अर्ज करु शकता.
भारत सरकारने मेरा रेशन 2.0 हे मोबाईल अॅप लॉंच केले आहे.
याद्वारे तुम्ही रेशन कार्डसंबंधी सर्व कामे सहज करु शकता.
त्यामुळे प्रत्येक वेळेस तुम्हाला सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही.
याद्वारे तुम्ही रेशन कार्डमध्ये नाव टाकू शकता किंवा हटवू शकता.
आधी जे काम करायला तुम्हाला रांग लावावी लागायची, पण आता एका क्विलकवर हे काम होणर आहे.
नागरिकांना दिलासा मिळावा हा यामागचा उद्देश आहे.
सरकारची महत्वाकांक्षी योजना डिजिटल इंडियामध्ये याचे महत्वाचे योगदान आहे.
प्ले स्टोअरमध्ये जाऊन अॅप डाऊनलोड करावे लागेल आणि महत्वाची माहिती भरावी लागेल.