लग्नातील सप्तपदीत नवरी 3 तर नवरा 4 फेरे का घेतो?


हिंदू धर्मातील लग्नात अनेक रिती रिवाज केले जातात.


फेरे घेण्याचा रिवाज यात महत्वाचा मानला जातो. फेरे घेतल्याशिवाय रिवाज पूर्ण होत नाही.


पण लग्नात ७ फेरेच का घेतले जातात? कधी विचार केलाय का?


यामध्ये 3 फेरे नवरी तर 4 फेरे नवरा मुलगा घेतो.


फेरे घेण्याच्या रिवाजामागे एक कारण आहे.


7 फेऱ्यांसोबत 7 वचनदेखील घेतले जातात.


हे वचन मुलाकडून मुलीला दिले जातात, असे मानले जायचे.


त्यामुळे सुरुवातीचे 4 फेरे हे मुलाकडून घेतले जाण्याची परंपरा आहे.


शेवटचे 3 फेरे मुलीकडून घेतले जातात.


पूण्य कर्म, घरची व्यवस्था आणि पतिव्रता होण्याशी संबंधित हे 3 फेरे आहेत.


यामुळे शेवटचे 3 फेरे मुलीकडून घेतले जाण्याची परंपरा आहे.


(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story