काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो यात्रे'च्या दुसऱ्या टप्प्याची तयारी सुरु करण्यात आली आहे. महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही माहिती दिली आहे.
भारत जोडो यात्रेच्या पहिल्या टप्प्यात कन्याकुमारी ते काश्मिर या 4000 किलोमीटरचा टप्पा राहुल गांधी यांनी पायी गाठला होता.
आता दुसरा टप्पा गुजरातपासून सुरु होणार असून मेघालायपर्यंत राहुल गांधी पायी प्रवास करणार आहेत.
भारत जोडो यात्रेचा पहिला टप्पा 7 सप्टेंबर 2022 मध्ये सुरु झाला. यादरम्यान 12 राज्य आणि दोन केंद्र शासित प्रदेशांमधून ही यात्रा काढण्यात आली.
भारत जोडो यात्रा तब्बल 130 दिवस चालली. 30 जानेवारी 2023 मध्ये काश्मिरमधल्या श्रीनगरमध्ये या यात्रेचा समारोप झाला.
'भारत जोडो यात्रा 2.0'चा मार्ग निश्चित झाला असला तरी ही यात्रा कधीपासून सुरु होणार याची माहिती अद्याप स्पष्ट करण्यात आलेली नाही.
गुजरात विधानसभेचे अध्यक्ष अमित चावडा यांनी राहुल गांधी यांना भारत जोडो यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात गुजरातमधून करावी अशी विनंती केली होती,
दरम्यान, मोदी आडनाव प्रकरणात सुप्रीम कोर्टाने दिलासा दिल्यानंतर आज राहुल गांधी यांना त्यांचा सरकारी बंगला परत करण्यात आला.
याबाबत विचारलं असता संपूर्ण भारतच माझं घर आहे अशी प्रतिक्रया राहुल गांधी यांनी दिली.