ताज्या आणि गोठवलेल्या चिकनची चव खूपच वेगळी असते. तर तुम्हाला खाताना तसं काही जाणवलं तर ते चिकन खाऊ नका.
चिकनला स्पर्श केल्यानंतर खूपच चिकटपणा जाणवत असेल आणि चिकन धुतल्यानंतरही चिकटपणा कायम राहत असेल तर समजून जा चिकन खूपच खराब आहे.
ताज्या चिकनला अतिशय सौम्य वास किंवा येत नाही. पण खराब चिकनला उग्र वास योते. कुजलेल्या अंड्यासारखा किंवा गंधयुक्त वास येत असेल तर समजून जा चिकन खराब आहे.
ताजं चिकनचा रंग गुलाबी आणि मांसाल असतो. पण जेव्हा चिकन खराब होतं तेव्हा त्याचा रंग फिका पडतो. जर एकदमच राखाडी पडलं असेल याचा अर्थ ते गरजेपेक्षा जास्त खराब झालं आहे.
चिकन खरेदी करताना किंवा शिजवताना त्यावर डाग आहेत की नाही ते बघा. विचित्र रंगाचे डाग असतील तर ते चिकन खराब असल्याची लक्षणं आहेत.
चिकन ताजं आहे की फ्रीजमधलं हे ओळखण्यासाठी आज आम्ही तुम्हाला पाच सोप्या गोष्टी सांगणार आहोत.
धावपळीच्या जगात अनेक जण आज बाजारात न जाता ऑनलाइन (Online shopping) चिकन मागवतात. मग अशावेळी ते चिकन ताजं आहे की फ्रीजमधलं कसं ओळखायचं?