कलंगुट बीच हा गोव्यातील सर्वात लोकप्रिय समुद्रकिनारा आहे, जिथं तुम्हाला चित्तथरारक देखावा पहायला मिळतो. इथं पाहण्यात खेळण्याची मजाच वेगळी..
जागतिक वारसा स्थळ असलेल्या ओल्ड गोव्यात तुमचं मन रमेल. हे ठिकाण समृद्ध इतिहासासाठी आणि आश्चर्यकारक वास्तुकलेसाठी प्रसिद्ध आहे.
फोर्ट अगुआडा हा 17व्या शतकातील सिंक्वेरिम समुद्रकिनाऱ्यावरील किल्ला आहे, जो पोर्तुगीज आक्रमणकर्त्यांविरूद्ध संरक्षणासाठी तयार करण्यात आला होता.
अनेकदा चर्चेत असलेला दूधसागर धबधबा पाहण्यासाठी तुम्हाला थोडी कसरत करावी लागेल. 320 मीटरपेक्षा जास्त उंचीवरून झिरपतो. हा धबधबा हिरव्यागार जंगलांनी वेढलेला आहे.
भारतीय आणि पोर्तुगीज संस्कृतींचे अद्वितीय मिश्रण अनुभवण्यासाठी एक उत्कृष्ट ठिकाण आहे. इथली घरं तुमच्या डोळ्याचं पारणं फेडतील.
अंजुना फ्ली मार्केट हे एक लोकप्रिय स्ट्रीट मार्केट आहे, इथं हस्तनिर्मित स्मृतिचिन्हे ते कपडे, दागिने आणि इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सपर्यंत सर्व काही मिळतात
मोरजिम बीच शांत समुद्रकिनारा आहे जो स्वच्छ पाणी, मऊ वाळू आणि शांत परिसरासाठी ओळखला जातो. हे ठिकाण लुप्तप्राय कासवांच्या अनेक प्रजातींसाठी ओळखला जातो.
चापोरा किल्ला हा एक नयनरम्य किल्ला आहे. हा किल्ला त्याच्या अनोख्या संरचनेसाठी प्रसिद्ध आहे. अनेक कलाकारांनी या किल्ल्याला भेटी दिल्या आहेत.
जुन्या गोव्यातील महत्त्वाची निशाणी म्हणजे से कॅथेड्रल... पोर्तुगीज वास्तुकलेचा उत्तम नमुना तुम्हाला पहायला मिळतो.