Anand Mahindra

Anand Mahindra : आनंद महिंद्रा यांना स्वत:च्याच कंपनीतून काढलं जाण्याची भीती? म्हणाले...

Jan 09,2024

तमिळनाडु ग्लोबल इन्वेस्टर्स मीट 2024 म

तमिळनाडु ग्लोबल इन्वेस्टर्स मीट 2024 मध्ये अनेक मोठ्या उद्योजकांमध्ये आनंद महिंद्रा सुद्धा सहभागी झाले होते. इथं त्यांनी सर्वांसमोरच एक किस्सा सांगितला. ही होती Scorpio चीच एक आठवण.

बाहेरचा रस्ता

परिस्थितीपुढं हतबल होण्यासंबंधीच्या एका प्रश्नाचं उत्तर देताना त्यांनी कमाल किस्सा सांगितला. हा किस्सा होता एका भीतीचा. संस्थेतून काढलं जाण्याची, बाहेरचा रस्ता दाखवलं जाण्याची भीती.

संकट

'काही वर्षांपूर्वी महिंद्रा स्कॉर्पियो लोकप्रिय झाली तेव्हा मी आयसीआयसीआय बँक प्रमुख केवी कामत यांच्यासोबत विमान प्रवास करत होतो. तेव्हाच त्यांनी सर्व बोर्ड सदस्यांसह केशव महिंद्रा यांनाही तुम्ही स्कॉर्पियोच्या बाबतीत संकट ओढावताय असंच वाटतंय, असं म्हटलेलं', असं आनंद महिंद्रा म्हणाले.

बाहेरचा रस्ता

एका प्रोडक्टसाठी कंपनीकडून इतका पैसा लावला जात आहे, हे आधी कधीच झालं नव्हतं. त्यामुळं ही कार यशस्वी ठरली नाही तर ते तुम्हाला कंपनीतून बाहेरचा रस्ता दाखवतील, असं कामत यांनी आनंद महिंद्रांना सांगत सावध केलं होतं.

स्वानुभव

यावेळी उपस्थितांसमोर त्यांनी स्वानुभवातून शिकलेल्या गोष्टी मांडल्या, जिथं त्यांनी पाण्यात पोहायचंय तर त्याची खोली पाण्यात उतरूनच पाहावी लागणार आणि मीसुद्धआ अगदी तेच केलं, असं सूचक वक्तव्य महिंद्रा यांनी केलं.

वस्तुस्थिती

स्कॉर्पियो कारच्या बाबतीत आपल्याकडे कोणताही पर्याय शिल्लक नव्हता असं सांगताना तुम्हाला काहीतरी मोठं करायचं आहे, तर आव्हानांचा सामना करावाच लागणार ही वस्तुस्थिती महिंद्रा यांनी मांडली.

VIEW ALL

Read Next Story