एअरटेलच्या पोर्टफोलिओमध्ये तुम्हाला अनेक रिचार्ज प्लॅनचा पर्याय मिळतो.
आज आम्ही एअरटेलच्या 181 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनबद्दल सांगणार आहोत.
ज्यामध्ये ग्राहकांना 15 GB डेटा मिळतो. ज्याची वैधता 30 दिवसांची आहे. यामध्ये तुम्हाला 22 OTT प्लॅटफॉर्मचं सबस्क्रिप्शन मिळणार आहे.
यासह ग्राहकांना एअरटेल Xstream Play एक्सेस मिळतो. याद्वारे तुम्हाला Sony LIV, Lionsgate Play आणि इतर ओटीटीमध्ये प्रवेश मिळेल.
एअरटेलच्या 181 रुपयांच्या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना कॉलिंग किंवा एसएमएसचे फायदे मिळत नाहीत.
ज्यांना डेटा आणि OTT प्लॅटफॉर्मचा एक्सेस हवा असेल तर त्याच्यासाठी हा प्लॅन एक चांगला पर्याय आहे.