सहसा PF ची रक्कम निवृत्तीनंतर काढली जाते. पण, लग्नसमारंभ, शिक्षण, एखादा वैद्यकिय खर्च किंवा भूखंड खरेदीच्या व्यवहारांसाठीसुद्धा हे पैसे खात्यातून काढता येतात.
निवृत्तीच्या एक वर्ष आधी तुम्ही PF खात्यातून 90 टक्के रक्कम काढू शकता.
एखाद्या संस्थेतील नोकरी सोडल्यानंतर साधारण दोन महिन्यांमध्ये ही रक्कम तुम्हाला मिळते.
नोकरीला असताना पाच वर्षांपूर्वी पीएफची रक्कम काढल्यास या रकमेवर टीडीएस कापला जातो.
50 हजार रुपयांवरील रक्कम काढल्यास TDS कापला जातो.
पीएफची रक्कम काढण्यासाठी तुम्हाला EPFO च्या संकेतस्थळावर किंवा उमंग अॅपवर भेट द्यावी लागेल.