World Mental Health Day

World Mental Health Day : तुमची वयात येणारी मुलं Depression मध्ये तर नाहीत? पालकांनो 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

Oct 10,2023

सतत उदास राहणं...

सतत असंतुष्ट, उदास राहणं चिडचीड करणं ही अशी लक्षणं तुमच्या मुलामध्ये काही महिन्यांसाठी दिसत असतील तर दुर्लक्ष करू नका.

झोपण्याच्या सवयींमध्ये बदल

नैराश्यामुळं तुमच्या मुलांच्या झोपण्याच्या सवयी बदलू शकतात. झोप न येणं किंवा प्रमाणापेक्षा जास्त झोप येणं अशा समस्यांचा सामना त्यांना करावा लागू शकतो.

भूक वाढणं किंवा कमी होणं

अनेकदा नैराश्यामुळं आपण किती खातोय हेच मुलांच्या लक्षात येत नाही. तर काहींना भूकच लागत नाही. ज्यामुळं याचे थेट परिणाम वयात येणाऱ्या मुलांच्या वजनावर दिसून येतात.

अशक्तपणा

कितीही छान आहार केला, कितीही चांगल्या ठिकाणी जाऊन आलं तरीही तुमच्या मुलांना सतत अशक्तपणा जाणवत असेल, मळमळ जाणवत असेल तर हे नैराश्य किंवा एखाद्या गोष्टीच्या दडपणाचं लक्षण असू शकतं.

एकाकीपणा

अचानकच मुलं एकटं राहणं पसंत करू लागतात. इतरांमध्ये मिसळत नाहीत. एकट्यात असतानाही शून्यातच पाहत राहतात असं आढळल्यास मुलांशी संवाद साधा.

शारीरिक वेदना

अनेकदा नैराश्यामुळं अशक्तपणा बळावतो आणि त्यामुळं शारीरिक व्याधींना वाव मिळते. अंगदुखी, उसण येणं. सतत काहीतरी होतंय असं वाटणं ही त्यातील काही लक्षणं

नैराश्याची लक्षणं

नैराश्याची लक्षणं व्यक्तीनुसार वेगवेगळी असतात. पण, यामध्ये योग्य वेळी ती जाणून घेत त्यावर काम करणं, पुरेसा संवाद साधणं आणि परिस्थिती समजून घेत त्यावर तोडगा काढणं यामुळं अनेक गोष्टी सुकर करता येतात. (वरील माहिती सर्वसामान्य संदर्भावर आधारलेली असून, तज्ज्ञांचा सल्ला कधीही योग्यच ठरेल.)

VIEW ALL

Read Next Story