थंडीनं जोर धरला की बरीच मंडळी, स्वेटर, रजई, हातमोजे, पायमोजे अन् कानटोपी असं लोकरी साहित्य काढत थंडीपासून बचाव करू पाहतात. काही मंडळींना मात्र बरीच थंडी पडूनही गारठा जाणवत नाही. पण, असं का? यामागे नेमकं कारण काय?
तज्ज्ञांच्या मते ज्यांचं मेटाबॉलिझम चांगलं आहे त्यांना थंडी जाणवत नाही, कारण त्यांचं शरीर वेगानं ऊब निर्माण करतं.
शरीरात मांसपेशींची संख्या जास्त असल्यास थंडीपासून सहज बचाव करता येतो. कारण यामुळंच शरीरात उष्णता निर्माण होते.
ज्या व्यक्तींच्या शरीरात चरबीचं प्रमाण अधिक असतं त्यांना गारठा लवकर जाणवत नाही. कारण, त्यांच्या शरीरातील अधिक प्रमाणातील चरबी इंन्सुलेटरचं काम करते.
जी मंडळी नियमित स्वरुपात योगाभ्यास करतात त्यांच्यामध्ये थंडी सहन करण्याची अधिक क्षमता असते.
ज्या व्यक्तीच्या शरीरात रक्ताभिसरण प्रक्रिया सुरळीत काम करते त्यांना थंडी कमी लागते. उत्तम रक्ताभिसरण प्रक्रियेमुळंही शरीरारील उष्णता कायम राहते. (वरील माहिती उपलब्ध संदर्भांवर असून, झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)