जेवल्यानंतरही पुन्हा लगेच भूक का लागते? या गोष्टी तुम्हालाही माहित नसतील

Saurabh Talekar
Apr 29,2024

अपूरी झोप

बऱ्याचदा आपली व्यवस्थित झोप होत नाही. त्यामुळे भूक वाढवणारे हॉर्मोन्स प्रभावित होतात. म्हणूनच आपल्याला जेवल्यानंतरही पुन्हा पुन्हा भूक लागते.

तणाव

मानसिक तणाव वाढल्यामुळे डिप्रेशन आणि ऍंग्झायटी यांसारखे डिसॉर्डर सुद्धा वाढतात. ज्यामुळे भूक लागण्याची शक्यता देखील जास्त असते.

प्रोटिन्सची कमतरता

आहारात प्रोटिन्स असल्याने पोट बराचवेळ भरलेलं असतं. जर आपल्या आहारात प्रोटिन्सची कमतरता असेल तर, आपल्याला सतत भूक लागते.

फायबर्सची कमतरता

फायबर्सने भरपूर पदार्थ भूक कमी करणारे हॉर्मोन्स प्रभावित करतात, त्यामुळे तुम्हाला सतत नवीन काहीतरी खावं वाटतं. त्यामुळे आहारात योग्य फायबर्स घ्या.

थायरॉइड्स

थायरॉइड्स हॉर्मोन्सचं प्रमाण वाढल्यास हायपर थायरॉइडिझ्म होतं. त्यामुळे सतत भूक जाणवते.

औषधे

काही औषधांच्या सेवनाने सुद्धा भूक लागते. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधे घ्या.

VIEW ALL

Read Next Story