स्तनाचा कर्करोग प्रामुख्याने स्त्रियांमध्ये आढळतो, परंतु क्वचित प्रसंगी, पुरुषांवर देखील त्याचा परिणाम होऊ शकतो.
स्तनाच्या कर्करोगानं ग्रस्त बहुतेक महिलांचे वय 50 पेक्षा जास्त असल्याचं आढळून आले आहे, परंतु तरुण स्त्रियांना देखील धोका असू शकतो.
स्तनाचा कर्करोगाचे लक्षण म्हणजे स्तनामध्ये वेदनारहित गाठ. काखेमधील कोणतीही गाठ किंवा सूज असल्यास त्याचमागचं कारण समजून घेतलं पाहिजे. त्यामुळे लगेच तपासनी करूण घ्या.
एक किंवा दोन्ही स्तनांच्या आकारात अचानक होणारे बदल हे चिंतेचे कारण असू शकते.
योग्य ब्रा न घातल्याने स्तनाचा कर्करोग होऊ शकतो असे अनेकांना वाटते. मात्र, हे चुकीचा समज असून याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही.
वैद्यकीय तज्ञांच्या मते, ब्रा घालणे, विशेषत: योग्य साईज असणारी ब्रा घालणे, स्तनाच्या कर्करोग होण्याचे कारण असल्याचे म्हटले जाते, त्याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही.
कोणत्या अशा चर्चांवर लक्ष न देता तुम्ही नियमितपणे तपासणी करणे ही आवश्यक गोष्ट आहे. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)