चिकू हे आरोग्यवर्धक फळ आहे. मात्र, काही लोकांना चिकू खाल्ल्याने शारिरीक समस्या निर्माण होवू शकतात.
किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्यांनी चिकू खाल्ल्यास यात असलेल्या पोटॅशियममुळे किडनीवर परिणमा होवू शकतो.
चिकुमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. डायबेटिस असलेल्या लोकांनी चिकू खाणे टाळावे.
चिकुमध्ये टेनिन आणि लेटेक्स असे केमिकल पदार्थ असतात. ज्याने शरीरावर एलर्जी होते.
ज्यांना अन्नपचनाचा त्रास आहे त्यांनी चिकू खावू नये. मोठ्या प्रमाणात फायबर असल्याने चिकू अन्नपचनात बाधा आणते.
चिकुमध्ये हाय शुगर असल्याने दात किडतात. दात दुखतात.यामुळे दातांची समस्या असणाऱ्यांनी याचे सेवन टाळावे.
चिकूमध्ये शुगरचे प्रमाण जास्त असते आणि कॅलरीही जास्त असतात. त्यामुळे जास्त प्रमाणात चिकू खाल्याने वजन झपाट्याने वाढते.