आजकाल धक्काधक्कीच्या जिवनात लाईफ सायकल बिघडलेले असते.
तुम्ही डेस्क जॉब करत असाल तर झोप येणे स्वाभाविक आहे.
तुम्ही 6-7 झोप घेता आणि ऑफिसमध्ये 4-5 तास काम करुन डुलकी येत असेल तर नॅप असे म्हणतात.
अशावेळी 10-15 मिनिटे नॅप घेणे खूप फायदेशीर असते, असे वैज्ञानिक सांगतात.
पॉवर नॅपमुळे शरीर आणि डोकं दुप्पट काम करण्यास तयार होते.
पण कामाच्या ठिकाणी खूप झोप येत असेल तर हा चिंतेचा विषय असू शकतो.
विटॅमिन डी आणि विटामिन B12 च्या कमतरतेमुळे तुम्हाला झोप येऊ शकते.
विटॅमिन डी ची कमी लहान मुले, वयस्कर कोणालाही होऊ शकते. झोप न येणं आणि रात्रभर जागे राहणं अशी लक्षणे यात दिसतात.
अशावेळी सुर्य प्रकाश शरिरासाठी खूप उपयोगी ठरतो. तसेच दूध, अंडे आणि मशरुम खाल्ल्याने यातून सुटका होते.
तुम्ही सर्व उपाय करुनही ओव्हर स्लीपची तक्रार असेल तर डॉक्टरांची भेट घ्या.