कस्तुरबा गांधी यांचा हा जन्मदिवस...म्हणून 11 एप्रिलची निवड

11 एप्रिल हाच दिवस निवडण्याचं कारण म्हणजे राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या पत्नी कस्तुरबा गांधी यांचा हा जन्मदिवस आहे.

Apr 11,2023

या संघटनेनं दिलेला दिवस साजरा करण्याचा सल्ला

1800 संस्थांची संघटना असलेल्या व्हाइट रॉबिन्स अलायन्स इंडियाच्या सल्लाने हा दिवस साजरा केला जातो.

ग्रामीण भागात माहितीचा तुटवडा

शहरी भागांमध्ये गरोदर महिलांच्या आरोग्यासंदर्भातील जागृकता मोठ्या प्रमाणात असली तरी ग्रामीण भागांमध्ये याबद्दलच्या माहितीचा तुटवडा जाणवतो. त्यामुळेच हा दिवस अशा जागृतीसाठी महत्त्वाचा मानला जातो.

गरोदर महिलांसाठीच्या योजनांबद्दल माहिती देणे

याच मृत्यूदरासंदर्भातील आणि गरोदर महिलांना योग्य उपचार मिळावेत, त्यांच्या प्रकृतीसंदर्भातील वेगवेगळ्या गोष्टींबद्दल जागृकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत असलेल्या संस्था, संघटनांबरोबरच या महिलांसाठीच्या योजनांचा प्रचार करण्यावर भर देण्यासंदर्भातील कामं लोकांपर्यंत पोहचवण्याचा दिवसाचा उद्देश असतो.

44 हजार महिला मरण पावतात

दरवर्षी भारतात 44 हजार महिला गर्भधारणेदरम्यान मरण पावतात. जगातील एकूण गरोदर महिला मृत्यूच्या 15 टक्के हे प्रमाण आहे.

या दिवसाचा उद्देश काय?

आई म्हणून महिलांची गरज, गरोदरपणामधील आरोग्यासंदर्भातील अधिक चांगल्या सुविधांच्या गरजांबद्दलची जागृकता निर्माण करणे हे या दिवसाचं उद्देश आहे.

पहिल्यांदा 2003 साली साजरा झाला हा दिवस

2003 साली पहिल्यांदा राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस म्हणजे National Safe Motherhood Day म्हणून साजरा करण्यात आला होता.

राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस

दरवर्षी 11 एप्रिल रोजी राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस म्हणजेच National Safe Motherhood Day साजरा केला जातो.

National Safe Motherhood Day 2023: आजचा दिवस प्रत्येक गरोदर महिलेसाठी आहे खास; जाणून घ्या कारण

VIEW ALL

Read Next Story