तुमच्या आहारात मिलेट्सचा समावेश करा म्हणजेच ज्याला मोटा अनाज या नावानं ओळखतात ते... त्यात बाजरी, नाचणी, जव, कुटकी, चना आणि ज्वारी यांसारख्या धान्यांचा समावेश होतो.
मिलेट्समध्ये लोह, फॉस्फरस, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि फायबर यांसारख्या पोषक तत्वांचा समावेश असतो.
मिलेट्स हे कार्बोहायड्रेट्स आणि ग्लूटेन-फ्री आहेत, ज्यामुळे ते वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात.
पावसाळ्यात मिलेट्सचे सेवन करणे फायद्याचे ठरते कारण त्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते आणि सर्दी, खोकला आणि ताप यांसारख्या विषाणूजन्य संसर्गाशी लढा देण्यास मदत करतात.
आरोग्य तज्ञ या हंगामात मिलेट्सचे मोठ्या प्रमाणात सेवन करण्यास सांगतात. कारण ते पचण्यास सोपे आहे.
आहारात बाजरीचा समावेश केल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि त्यानं लवकर भूक लागत नाही.
मिलेट्समध्ये अॅन्टी एजिंग गुणधर्म असतात त्यामुळे त्वचा ही निरोगी राहते. (All Photo Credit : Freepik)