आलं वापरलं जातं,...

प्रत्येक प्रकारच्या पदार्थामध्ये आलं वापरलं जातं, म्हणून ते मोठ्या प्रमाणात स्टोर केलं जातं. पण आलं साठवण्याचा योग्य मार्ग कोणता आहे, हे जाणून घेऊया.

Jun 12,2023

आलं वापरायचं असेल...

जर तुम्हाला एक किंवा दोन आठवड्यांपर्यंत आलं वापरायचं असेल, तर तुम्ही आलं सामान्य तापमानावर ठेवू शकता. परंतु थेट सूर्यप्रकाशापासून आलं दूर ठेवा आणि थंड, कोरड्या जागी ठेवा.

आलं ओलसर ठिकाणी...

आलं ओलसर ठिकाणी किंवा फ्रिजमध्ये ठेवल्यास त्याला बुरशी येऊ शकते.जर तुम्हाला आल्याचं शेल्फ लाइफ वाढवायचं असेल आणि तुमच्याकडे भरपूर आलं असेल तर तुम्ही ते रेफ्रिजरेटरमध्ये देखील ठेवू शकता.

आलं सुकते...

बऱ्याचदा रेफ्रिजरेटरमध्ये आलं ठेवल्यावर अनेक वेळा आलं सुकते किंवा आर्द्रतेमुळे कुजतं किंवा आल्याला बुरशी लागते, म्हणून ते नेहमी प्लास्टिकच्या पिशवीत किंवा हवाबंद कंटेनरमध्ये ठेवा.

बऱ्याचदा रेफ्रिजरेटरमध्ये आलं....

बऱ्याचदा रेफ्रिजरेटरमध्ये आलं ठेवल्यावर अनेक वेळा आलं सुकते किंवा आर्द्रतेमुळे कुजतं किंवा आल्याला बुरशी लागते, म्हणून ते नेहमी प्लास्टिकच्या पिशवीत किंवा हवाबंद कंटेनरमध्ये ठेवा.

आलं दीर्घकाळापर्यंत टिकवून ठेवण्यासाठी ...

आलं दीर्घकाळापर्यंत टिकवून ठेवण्यासाठी ते झिप लॉक बॅगमध्येकिंवा सीलबंद पिशवीत किचन पेपर टाकून तुम्ही आलं साठवू शकता, त्यामुळे आलं बराच काळ ताजं राहतं.

आल्याचा तुकडा सोलून...

आल्याचा तुकडा सोलून किंवा किसून घेतल्यानंतर लगेच वापरा, अर्धं कापलेलं आलं लवकर खराब होतं.

भरपूर आलं असेल तर ...

जर तुमच्याकडे भरपूर आलं असेल तर आल्याचे लहान तुकडे करून त्याची पेस्ट बनवा. यासाठी पाण्याऐवजी थोडं तेल आणि मीठ वापरावं. मग त्यापासून बर्फाचे तुकडे करून फ्रिजरमध्ये ठेवा आणि जेव्हा गरज असेल तेव्हा त्याचा वापर करा.C

जर आलं सुकलं..

जर आलं सुकलं असेल तर तुम्ही ते सुकवून भाजून घेऊ शकता आणि पावडर बनवून देखील वापरू शकता.

पेस्ट बर्‍याच काळासाठी...

जर आपल्याला पेस्ट बर्‍याच काळासाठी घरात ठेवायची असेल तर आपण या पेस्टमध्ये थोडे मीठ आणि तेल ठेवावे. ही पद्धत आपली पेस्ट अधिक दिवस जतन करेल.

VIEW ALL

Read Next Story