तांबे, स्टील आणि पितळेची भांडी स्वच्छ गृहिणी बाजारातून पीतांबरी आणतात. पीतांबरीमुळं काळीकुळकुळीत पडलेली भांडीदेखील लख्ख चमकतात.
बाजारातून पितांबरी आणण्याऐवजी आता तुम्ही घरातल्या घरातही सोप्या पद्धतीने पितांबरी पावडर तयार करु शकता. कसं ते जाणून घ्या.
साइट्रिक अॅसिड, मीठ,गव्हाचे पीठ,कपडे धुण्याची पावडर,खाण्याचा रंग
आता एका भांड्यात एक चतुर्थांश मीठ घ्या. त्यानंतर त्यात साइट्रिक अॅसिडची पावडर मिसळा.
आता या मिश्रणात एक चतुर्थांश गव्हाचे पीठ आणि कपडे धुण्याची पावडर मिसळा.
त्यानंतर या मिश्रणात 2-३ थेंब खाण्याचा रंग टाकून मिस्करमध्ये हे मिश्रण एकजीव करुन घ्या. त्यानंतर हे मिश्रण एका एअर टाइट कंटेनरमध्ये स्टोर करा.