आजच्या काळात बाजारात प्रत्येक गोष्टीत भेसळ दिसून येते. मिठाईवर असलेल्या चांदीच्या वर्कमधेही आजकाल भेसळ होत आहे.
चांदीचा वर्क बनवण्यासाठी त्यात ॲल्युमिनियमही मिसळले जाते, कारण दोन्ही दिसायला सारखेच असतात, असे अनेक केसेसमध्ये दिसून आले आहे.
याशिवाय निकेल, शिसे आणि कॅडमियम या इतर जड धातूंमध्ये भेसळ केली जात आहे, जी आपल्या आरोग्यासाठी चांगली नाही.
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) ने आता चांदीचा वर्क तयार करण्यासाठी प्राण्यांच्या वापरावर बंदी घातली आहे.
कारण पूर्वी चांदी बैल आणि म्हशींच्या चमड्यावर ठेवून नंतर वर्कला पातळ करण्यासाठी हातोड्याने मारले जायचे.
भेसळीचा संशय आल्यास चांदीचे वर्क घेऊन त्याला आग लावा, जर त्यात धातूचा वास येत असेल तर तो खरा आहे, पण जर त्यात चरबीचा वास येत असेल तर तो मांसाहारी आहे हे समजून जा.
(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)