भारतात दारु पिणाऱ्यांची संख्या वाढली आहे. जर्मन संस्थेच्या रिसर्चनुसार, 2010 ते 2017 पर्यंत भारतात दारुची विक्री 38 टक्क्यांनी वाढली आहे.
या रिसर्चमध्ये दावा करण्यात आलाय की, भारतात प्रति व्यक्ती दारुची विक्री 4.3 लीटरने वाढून 5.9 लीटरपर्यंत पोहोचली आहे. यामध्ये महिला-पुरुष दोघांचाही समावेश आहे.
भारतात पुरुषांनी दारु पिण्याला वाईट व्यसन म्हटलं जात. त्यात महिलांनी दारु प्यायली तर नुसत्या चर्चा रंगतात.
भारतात दारु पिणाऱ्या महिलांची संख्या वाढतेय. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पुढे येणाऱ्या महिला याबाबतीतही पुरुषांना टक्कर देतायत.
देशात 1.5 कोटी महिलांना कोणंत ना कोणत व्यसन आहे, असे 2019 मध्ये केंद्रीय राज्यमंत्री रतन लाल कटारिया यांनी लोकसभेत एका प्रश्नाल उत्तर देताना म्हटले होते.
खासदार पंकज चौधरी यांनी यावर प्रश्न विचारला होता. 'एनडीडीटीसी आणि एआयआयएमएस च्या 2019 च्या रिपोर्टनुसार, व्यसनाधिन महिलांमध्ये 90 लाख जणींना दारुचे व्यसन असते.'
कटारियांनी म्हटले, 'देशातील कोणतं राज्य असं नाही ज्यात महिला दारु पित नाहीत. प्रत्येक 16 पैकी एक महिला दारुच्या अधिन आहे.'
केंद्र सरकारच्या 2019 ते 2022 दरम्यान नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेतही या दाव्याला दुजोरा देण्यात आलाय.
2022 मध्ये आलेल्या सर्व्हेच्या आकडेवारीनुसार, देशात दरवर्षी 16 कोटी लोकं दारु पितात.
ज्यामध्ये 15 वर्षापेक्षा अधिक वयाचे 19 टक्के पुरुष आणि 1.03 टक्के महिलांचा समावेश आहे.
दारु पिणाऱ्या पुरुषांमध्ये 19.9 टक्के शहरी आणि 16.5 टक्के ग्रामीण आहेत. महिलांच्या बाबतीत ही आकडेवारी उलट आहे.
दारु पिणाऱ्या पुरुषांमध्ये 19.9 टक्के शहरी आणि 16.5 टक्के ग्रामीण आहेत. महिलांच्या बाबतीत ही आकडेवारी उलट आहे.
गावांमध्ये 1.06 टक्के महिला तर शहरांमध्ये 0.6 टक्के महिला दारु पितात.
15 वर्षापेक्षा पुढच्या दारु पिणाऱ्या सर्वाधिक 24 टक्के महिला अरुणाचल प्रदेशमध्ये आहेत. सिक्किम यात 16 टक्क्यांनी दुसऱ्या स्थानी आहे.