थंडीत मध खाणे शरीरासाठी अत्यंत शक्तीवर्धक आहे.


थंडीत वातावरणातील गारवा आणि शरिरात होणारे बदल यासाठी मध अत्यंत लाभदायी आहे.


मधामध्ये एन्जाइम, अमीनो एसिड, प्रोटीन, एल्ब्युमिन, कार्बोहायड्रेट्स, आयोडीन, लोह, सोडियम, फॉस्फरस, कॅल्शियम, क्लोरीन इत्यादी गुणकारी तत्व असतात.


मध खाल्ल्याने रोग प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. यामुळे थंडीत होणाऱ्या आजारांपासून बचाव होतो.


मधाच्या सेवनाने ताजेतवाने राहण्यास मदत तर होतेच, शिवाय पाचन शक्ती सुधारते.


रोज पाण्यात मध टाकून प्यायल्यास पोट हलके राहते.


एक्झिमा, त्वचा सुजणे आणि इतर विकारांध्ये मध प्रभावशाली आहे.

VIEW ALL

Read Next Story