बदलेली जीवनशैली, धावपळीचा दिनक्रम यामुळे आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्या आहेत.
शरीरात युरिक अॅसिडचे प्रमाण वाढण्याचं हे एक कारण आहे.
शरीरात युरीक अॅसिडचे प्रमाण जास्त झालं तर आरोग्यासाठी ही गोष्टी खूपच धोकादायक आहे.
हे शरीरात तयार होणारे एक प्रकारचे टॉक्सिन आहे.
युरिक अॅसिड असलेल्या पदार्थांमधून शरीरात जास्त प्रमाणात प्युरीन जमा होते.
पान कोबी, कोबी,मशरूम, चिकन, सीफूड या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात प्यूरीनअसतं. जर तुम्हाला वारंवार युरिक अॅसिडची समस्या त्रास देत असेल तर अशावेळी आपल्याला या पदार्थांचा समावेश आहरांमध्ये करायचा नाही.
शरीरामध्ये युरिक अॅसिडचे प्रमाण वाढले तर अशावेळी मनुके अजिबात खाऊ नका, कारण 100 ग्रॅम मनुक्यांमध्ये अंदाजे 105 मिलिग्रॅम प्यूरीन असते.
पालक आणि हिरवे वाटाणे यामध्ये जास्त प्रमाणात प्यूरीन असते. तुमच्या शरीरामध्ये युरिक अॅसिड जास्त प्रमाणात वाढलं असेल तर अशा वेळी या दोन्ही पदार्थ खाऊ नका.
शेंगदाणे हे आपल्या शरीरासाठी पोषक आहे. परंतु 100 ग्रॅम शेंगदाण्यांमध्ये 75 एमजी प्यूरीन असते अशात संधिवात आणि गाउटच्या रुग्णांच्या शरीरात युरिक अॅसिड वाढते. त्यामुळे अशा लोकांनी आपल्या आहारामध्ये शेंगदाण्याचा समावेश अजिबात करू नये.
दारूमध्ये प्यूरीनची मात्रा जास्त असते म्हणूनच जर तुम्हाला युरिक अॅसिडचा त्रास जास्त सतावत असेल तर अशा वेळी मद्यपान अजिबात करू नका.