एका दिवसात आपण किती वेळा श्वास घेतो आणि सोडतो ठाऊक आहे का?

Swapnil Ghangale
May 11,2024

फुफ्फुसासंदर्भातील रंजक गोष्टी

आपण दिवसातून किती वेळा श्वास घेतो आणि सोडतो ठाऊक आहे का? याचसंदर्भात आणि आपल्या फुफ्फुसांसदर्भातील रंजक गोष्टी जाणून घेऊयात...

फुफ्फुसांचा आकार वेगवेगळा

तुमचं डावं फुफ्फुस हे उजव्या फुफ्फुसापेक्षा आकाराने लहान असतं. छातीमध्ये हृदयासाठी जागा व्हावी यासाठी ही अशी रचना असते.

70 टक्के निरुपयोगी हवा

तुमच्या फुफ्फुसांमधून 70 टक्के निरुपयोगी हवा केवळ श्वासोच्छावासाच्या माध्यमातून बाहेर फेकली जाते.

एका फुफ्फुसांवर जगू शकतो व्यक्ती

माणूस एका फुफ्फुसाच्या आधारे जिवंत राहू शकतो. फक्त त्याच्या हालचालींवर आणि कष्ट करण्याच्या क्षमतेवर मर्यादा येते.

कितीही जोरात हवा सोडली तरी...

आपण कितीही जोरात श्वास सोडला तरी आपल्या फुफ्फुसांमधील श्वासनलिकांमध्ये किमान 1 लीटर हवा असतेच. यामुळेच मानवी शरीरामधील फुफ्फुस असा एकमेव अवयव आहे जो काहीही झालं तरी पाण्यावर तरंगतो.

शरीराला लागतो केवळ 5 टक्के ऑक्सिजन

आपण जो श्वास घेतो त्यामध्ये ऑक्सिजन हा एक घटक असतो. आपण जो श्वास घेतो त्यापैकी केवळ 21 टक्के ऑक्सिजन असतो. मात्र आपल्या शरीराला 5 टक्के ऑक्सिजन लागतो. उर्वरित ऑक्सिजन शरीर श्वास सोडताना बाहेर फेकतं.

महिला आणि मुलं वेगाने श्वास घेतात

पुरुषांच्या तुलनेत महिला आणि लहान मुलं अधिक वेगाने श्वास घेतात.

श्वासातून बाहेर फेकलं जातं पाणी

मानवी श्वासामधून एका तासाला 17.5 मिलिलीटर पाणी बाहेर फेकलं जातं.

दिवसाचा आकडा किती?

लंग्स फाऊंडेशन डॉट को डॉट एयूनुसार दिवसाला आपण 22 हजार श्वास घेतो.

वय, लिंग आणि प्रकृतीनुसार आकडा बदलतो

सामान्य परिस्थितीमध्ये एक सामान्य व्यक्ती दिवसातून 22 ते 27 हजार वेळा श्वास घेते आणि सोडते. हा आकडा वय, लिंग, शारिरीक व्याधीनुसार वेगवेगळा असतो.

VIEW ALL

Read Next Story