कसे स्वच्छ करावे

तुमचा ब्रश नियमितपणे स्वच्छ केला नाही, तर तुम्हाला एक्ने, पिंपल आणि पुरळ यासारख्या समस्या उद्भवू शकतात. कसे स्वच्छ करावे ते जाणून घ्या

Jun 21,2023

ब्रश स्वच्छ करणे खूप सोपे आहे. ते स्वच्छ करण्यासाठी तुम्हाला मऊ टॉवेल लागेल.

सर्वप्रथम ब्रशमधील प्रोडक्ट टॉवेलने पूर्णपणे स्वच्छ करा.

नंतर एका भांड्यात बेबी शॅम्पू मिक्स करा.

सर्व ब्रश आणि ब्युटी ब्लेंडर पाण्यात टाका आणि काही वेळ राहू द्या.

काही वेळाने हे ब्रश काढून टाका आणि हलक्या हाताने त्यांना तुमच्या दुसऱ्या हाताच्या तळहातावर सर्कुलर मोशन मध्ये फिरवत स्वच्छ करा.

काळजी घ्या की ब्रश जास्त जोराने साफ केले नाही. असे केल्याने त्याचे ब्रिसल्स खराब होतात.

साफ केल्यानंतर ब्रशला स्वच्छ टॉवेल किंवा टिश्यूवर काही वेळ सुकविण्यासाठी ठेवा.

ब्रश स्वच्छ न केल्यास ब्रशवर बॅक्टेरिया वाढण्याचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत त्या ब्रशच्या वापरामुळे त्वचेवर बॅक्टेरिया पसरतात.

जर तुम्ही तुमच्या मेकअप ब्रशेसची योग्य काळजी घेतली तर तुमचे ब्रश जास्त काळ टिकतील.

VIEW ALL

Read Next Story