सध्याच्या व्यस्त जीवनशैलीत शरीर तंदुरुस्त ठेवणं कठीण झालं आहे. रोज चालण्याने आपण अनेक आजार टाळू शकतो.
उन्हाळ्याच्या दिवसात फीट राहण्यासाठी रोज किती पावलं चालली पाहिजेत, असा प्रश्न पडतो.
अमेरिकन काऊंसिल ऑफ एक्सरसाइजनुसार, दररोज 2500 पावलं चालली पाहिजेत.
अनेक संशोधक 10 हजार पावले चालण्याचा सल्ला देतात. यामुळे लठ्ठपणावर नियंत्रण ठेवण्यासोबतच हृदयाचं आरोग्यही सुधारतं.
रोज चालण्याने तुम्हाला वेगळा व्यायाम करण्याची गरज भासणार नाही
रोज पायी चालण्याने झोप चांगली येण्यास मदत होते.