डोकेदुखी हा एक सामान्य त्रास आहे, पण काही लोक या त्रासामुळे पूर्ण दिवस डोके धरून बसतात.
त्यावर उपाय म्हणून अनेक लोक पेनकिलर किंवा डोकेदुखीवरील औषधे घेतात.
पण तुम्हाला माहितीये का, या पेनकिलर किंवा डोकेदुखीवरील औषधे दीर्घकाळ घेतल्यामुळे त्याचा शरीरावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो?
यामुळेच डॉक्टरसुद्धा स्वतः या औषधांपासून लांब राहतात आणि घरगुती उपाय करतात.
जर डोकेदुखी असेल तर त्यावर उपाय म्हणून आल्याचा चहा पिऊ शकता.
प्रथम थोडं आलं कुटून 2 कप पाण्यात उकळून घ्या.
5 मिनिटांनंतर एका कपात गरमागरम ओतून घ्या. त्यात एक चमचा लिंबाचा रस आणि चवीनुसार मध घाला.
हा चहा प्यायल्याने काही मिनिटांमध्येच डोकेदुखीपासून आराम मिळू लागतो.
पेनकिलर घेण्यापेक्षा हा चहा प्यायल्याने तुमची डोकेदुखी नष्ट होऊ लागेल.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)