किती अंतर ठेवावं?

खाण्यानंतर किमान दोन तासांच्या अंतरानं Blood Pressure मोजा. चहा- कॉफी प्यायल्यानंतर, व्यायाम केल्यानंतर किमान 30 मिनिटांच्या अंतरानं Blood Pressure मोजा. (वरील माहिती सर्वसामान्य संदर्भाच्या आधारे घेण्यात आली आहे. कोणताही निर्णय घेण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Apr 03,2023

निवांत बसा

रक्तदाब घरी मोजत असाल तरीही तो मोजताना कुणाशीही संवाद साधू नका. यामुळं आकडे वरखाली होऊ शकतात. शरीर शक्य तितकं Relax ठेवा.

योग्य आकडेवारीसाठी...

Blood Pressure तपासताना कपड्यांची बाही वर करून ते यंत्र थेट त्वतेच्या संपर्कात येतंय ना, याची काळजी घ्या. तरंच तुम्हाला योग्य आकडेवारी मिळू शकेल.

एकाच वेळी मोजा Blood Pressure

पाच मिनिटांपेक्षा कमी फरकानं एकाच हातात Blood Pressure मोजू नका. ज्या हाताची आकडेवारी जास्त आहे ती ग्राह्य धरा. दिवसातून एकाच वेळी तो मोजण्याचा प्रयत्न करा.

योग्य पद्धत

रक्तदाब तपासताना तुमचा दंड हृदयाच्या बरोबरीनच एखाद्या टेबलावर ठेवा. यासाठी तुम्ही घरात असणाऱ्या खुर्ची किंवा एखाद्या टेबलाचा वापर करु शकता.

तीनदा रक्तदाब तपासावा

एका अहवालानुसार तीन मिनिटांच्या फरकानं तीनदा रक्तदाब तपासावा. असं केल्यास योग्य आकडेवारी समोर येते. त्यामुळं घरी एकदाच ब्लड प्रेशर तपासून थांबू नका.

Health Tips

Health Tips : घरच्या घरी Blood Pressure मोजताना करु नका 'या' चुका

VIEW ALL

Read Next Story