रोज गाजर खाल्ल्याचा शरीराला मिळेल 'हा' फायदा

Pravin Dabholkar
Oct 13,2023


अनेकांना आपल्या स्किनवर नॅचरल टॅनिंग हवी असते. यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिकरित्या ग्लो दिसतो.


सोशल मीडियात सध्या कॅरट टॅन नावाचा ट्रेंड सुरु आहे. गाजर खाल्ल्याने चेहऱ्यावर नैसर्गिकरित्या ग्लो येईल असा दावा यात केला जात आहे.


रोज 3 गाजर खाल्ल्याने माझी त्वचा नैसर्गिकरित्या टॅन झाली, असे इसाबेल लक्स नावाच्या टिकटॉकरने म्हटले.


गेले काही वर्षे रोज 3 गाजर खाल्ल्याने माझी त्वचा नैसर्गिकरित्या टॅन झाल्याचे इसाबेल सांगते.


शाळेपासूनच मला गाजर खायला आवडायचे. यानंतर मी खूप गाजर खाऊ लागले. याचे चांगले परिणाम चेहऱ्यावर दिसू लागल्याचे ती सांगते.


गाजर एवढे आवडायचे की ती दिवसाला 10 गाजर खाऊ लागली होती. यामुळे ती आजारीदेखील पडली होती.


यानंतर 10 गाजरऐवजी 3 गाजर खा असा सल्ला तिला डॉक्टरांनी दिला होता.


काही आठवडे रोज 20-25 ग्रॅम बीटा कॅरेटीन खाल्ल्याने स्किनच्या रंगात हलका पिवळेपणा येतो, अस एक्सपर्ट सांगतात.


काही आठवडे तुम्ही रोज 10 गाजर खाल्लात तर स्किनवर पिवळेपण येईल. हे टॅन नाही तर स्किनचे पिवळेपण म्हणता येईल, असे तज्ञ सांगतात.


गाजरामुळे विटामिन ए मिळतात. हे नॅचरल सनस्क्रीनप्रमाणे कार्य करते. दोन दिवसात 1 गाजर खाल्ले तरी शरिराला पुरेसे बीटा कॅरेटीन मिळते.

VIEW ALL

Read Next Story