अनेकांना चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असते. आपल्या देशात 99 टक्के लोकांची सकाळ ही चहा किंवा कॉफीने होते.
पण तुम्हाला माहित आहे का? काही आजार असे आहेत, ज्यात कॉफी पिणं आरोग्याला हानीकारक ठरू शकतं.
उच्च रक्त दाबाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी कॉफी पिणं टाळायला हवं. कॅफीनमुळे शरीरातील रक्तदाव वाढण्याची भीती असते.
मधुमेहाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनीही कॉफी कमी प्यावी. कॉफित साखर असल्याने शरीरात साखरेची पातळी वाढण्याची भीती असते.
जर वारंवार लघवीला होत असेल तर कॉफी पिणं टाळायला हवं. कॉफीमुळे हा त्रास वाढण्याची शक्यता असते.
तणावात असताना अनेकांना कॉफी पिण्याची सवय असते. पण जास्त कॉफी प्यायल्याने शरीरातील कार्टिसोल हार्मोनवर परिणाम होऊ शकतो.
Disclaimer : ही माहिती केवळ जागरुकता निर्माण करण्यासाठी आहे. सामान्य माहितीच्या आधारे घेण्यात आलेली आहे. कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.