अननसमध्ये गॅलिक अॅसिड असते. या अॅसिडमुळे शरीरातील फॅट्स कमी होतात. त्यामुळे जर तुम्ही रोज 123 ग्राम अननस खाल्ले तर तुमचे वजन झटपट कमी होईल.
संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी, फायबरचे प्रमाण जास्त असते. जे वजन कमी करण्यास खूप मदत करते. व्हिटॅमिन सी आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. हे हृदयविकारांपासून बचाव करते आणि वजन कमी करण्यास देखील मदत करते. वजन कमी करण्यासाठी महिलांनी 75 मिलीग्राम आणि पुरुषांनी 90 मिलीग्राम व्हिटॅमिन सी दररोज सेवन केले पाहिजे.
स्ट्रॉबेरी वजन कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. स्ट्रॉबेरीमध्ये कॅलरीजचे प्रमाण नगण्य आहे. तर आरोग्यासाठी इतर अनेक पोषक तत्वे मुबलक प्रमाणात आढळतात. स्ट्रॉबेरीचे सेवन केल्याने उच्च कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब, जळजळ या समस्या कमी होतात. ज्या लोकांचे वजन जास्त आहे. त्यांना या समस्या होण्याचा धोका जास्त असतो.
पपईमध्ये फायबर, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात आढळते. पपई पचनासाठी चांगली असते आणि ते यकृत देखील डिटॉक्स करते. यामध्ये असलेले फायबर पोटाचे आरोग्य राखण्यासोबत वजन कमी करण्यास मदत करते. रोजच्या आहारात पपईचा समावेश केल्यास चयापचय वाढतो.
उन्हाळ्यात टरबूज, खरबूज यांसारखी फळे भरपूर खा. या फळांमध्ये पाण्याचे प्रमाण खूप कमी असते. याशिवाय या फळांमध्ये फायबर, अँटिऑक्सिडंट्स, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, बीटा-कॅरोटीन, लायकोपीन यांसारख्या पोषकतत्त्वे भरपूर असतात. वजन कमी करण्यासाठी तुम्ही ही फळे स्मूदी, सॅलड किंवा ज्यूस बनवून पिऊ शकता.
सफरचंदांमध्ये कॅलरीज कमी असतात आणि खनिजे, प्रथिने, अँटिऑक्सिडंट्स आणि फायबर भरपूर असतात. सफरचंद हे निरोगी फळांपैकी एक मानले जाते जे वजन कमी करण्यासाठी तसेच मेंदूच्या आरोग्यासाठी चांगले आहे. याशिवाय सफरचंदामुळे पचनक्रिया चांगली राहण्यास मदत होते.