दारू आरोग्यासाठी हानिकारक आहे, हे सर्वांना माहिती आहे. मात्र, याचे सेवन करणाऱ्यांचे प्रमाण काही कमी नाही. तेव्हा दारू पिताना काय घेऊ नये हे आपण जाणून घेऊया...
काही खास शीतपेयांमध्ये अल्कोहोल असतं. हे त्यात साखरेचं प्रमाण जास्त असल्यामुळे आहे. जेव्हा या पेयांमध्ये नैसर्गिक चव वाढवणारी सामग्री जोडली जाते तेव्हा अल्कोहोलचं प्रमाण आणखी वाढतं. अनेक सॉफ्ट ड्रिंकमध्ये 0.5% एबीव्ही असते.
काही प्रकारच्या फळांमध्ये, त्यांच्या रसांमध्ये अल्कोहोल असतं. यात द्राक्ष, संत्र्याचा समावेश आहे. सफरचंद. सफरचंदाच्या रसातही नशा असते. जर ते बऱ्याच काळासाठी तसंच ठेवलं तर त्यातील अल्कोहोलचं प्रमाणत वाढतं. यात 0.4 ते 0.5 टक्के अल्कोहोल आढळतं.
वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिनेगरमध्ये वेगवेगळ्या प्रमाणात अल्कोहोल असते. व्हाईट वाईन व्हिनेगर. शॅम्पेन व्हिनेगरच्या नावावरूनच त्यात अल्कोहोल आहे हे समजतं. पण ऍपल सायडर व्हिनेगरमध्येही अल्कोहोल असतं. त्यात 0.1-0.4% ABV आढळतो.
दुधाचे लॅक्टोज खाणारे सूक्ष्मजीव दह्यात अल्कोहोल तयार करतात. यामध्ये Bifidobacterium आणि Lactobacillus सारख्या जीवाणूंचा समावेश होतो. दह्यामध्ये 0.05 ते 2% एबीव्ही असते.
ब्रेड बनवण्यासाठी त्यात यीस्ट वापरतात. यीस्ट असलेल्या प्रत्येक ब्रेडमध्ये नेहमी अल्कोहोल असतं. ब्रेडमध्ये तुम्हाला 1.18 ते 1.28 टक्के अल्कोहोल मिळेल.
पिकलेल्या केळ्यात 0.2 टक्के एबीव्ही अल्कोहोल असते. पण खूप पिकलेल्या केळींमध्ये हे प्रमाण 0.4 टक्क्यांपर्यंत जातं.