मोबाईलवर व्हिडीओ पाहणे, गेम्स खेळणे, इतर अॅप्सचा अतिवापर करण्याचे प्रमाण तरुणांमध्ये वाढत चालले आहे.
यामुळे नैराश्य आणि तणावाचे प्रमाण तरुणांमध्ये वाढत चालले असून त्यांच्या शरीरावरही वाईट परिणाम होत आहे.
मोबाईल स्क्रीनचा अतिवापर केल्यामुळे मेंदूवर परिणाम होऊ शकतो.
मोबाईलचा सतत वापर केल्याने डोकेदुखी, टेंशन, निद्रनाश अशा शारीरिक समस्यांना तरुणांना सामोरे जावे लागत आहे.
जास्त वेळ मोबाईलचा वापर केल्याने तरुणांच्या मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होत आहे. त्यामुळे मोबाईलचा वापर सर्वांनी गरजेपुरता करावा.
मोबाईलमधील प्ले स्टोरमध्ये अशी अॅप उपलब्ध आहेत, ज्यावर तुम्ही तुमचे मोबाईल वापरण्याचे प्रमाण मोजू शकता. त्यामुळे तुम्ही किती वेळ मोबाईलचा वापर करतात माहिती होईल.
प्ले स्टोरवर qualitytime हे अॅप उपलब्ध आहे. या अॅपद्वारे तुम्ही एक ठराविक वेळ ठरवू शकता. या ठरवलेल्या वेळेत तुम्ही सर्व अॅपच्या नोटीफिकेशन चेक करू शकता.
(दिलेली माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)