मुंबईसह महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कन्जक्टीव्हायटीस (conjunctivitis) म्हणजेच डोळे येण्याचे रुग्ण वाढले आहेत
डोळ्यांचा विषाणू संसर्ग हा मुख्यत्वे अॅडीनो वायरसमुळे होतो.
याच्या लक्षणांमध्ये डोळ्यांना खाज सुटणे, डोळे लाल होणे, पापण्या सुजणे आणि संसर्ग झालेल्या डोळ्यांतून पांढरा स्त्राव येणे, यांचा समावेश होतो.
डोळ्यांचा विषाणूजन्य संसर्ग हा सौम्य प्रकारचा संसर्ग असला तरी देखील याबाबत नागरिकांनी आवश्यक काळजी घेणे गरजेचे आहे.
डोळ्याची साथ पसरू नये म्हणून सार्वजनिक आरोग्य विभागाने केलेल्या उपाययोजना
मुंबईत ज्या परिसरात अधिक रुग्ण आहेत तेथे महापालिका आरोग्य विभागाचे कर्मचाऱ्यांकडून घरोघरी भेटी देऊन सर्वेक्षण करण्यात येते.
याबाबत विभागातील सर्वसामान्य नागरिकांना जनजागृती करून आवश्यक ती माहिती दिली जाते.
सर्व आरोग्य संस्थांमध्ये कन्जक्टीव्हायटीस (Conjuntivitis) आजाराच्या उपचारासाठी लागणारी आवश्यक औषधे उपलब्ध आहेत.