प्रसिद्ध सोशल मीडिया स्टार पूनम पांडे यांचे निधन झालं आहे. वृत्तानुसार, ती गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाने ग्रस्त होती. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा सायलेंट किलर आहे.
पूनमच्या अधिकृत अकाऊंटवरून शेअर केलेल्या पोस्टवरून ही बाब समोर आली आहे. ती बऱ्याच दिवसांपासून या आजाराने त्रस्त होती.
पूनमच्या इन्स्टा पोस्टमध्ये “आजची सकाळ आमच्यासाठी कठीण आहे. अत्यंत दुःखाने कळवावे लागते की, गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे आम्ही आमची लाडकी पूनम गमावली आहे," असे म्हटलं आहे.
सरकारच्या अर्थसंकल्पात 9 ते 14 वर्षे वयोगटातील मुलींसाठी गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगासाठी मोफत लसीकरणाची घोषणा करण्यात आली होती. तेव्हाच ही दुःखद बातमी समोर आली आहे.
हा आजार, ज्याला अनेकदा 'सायलेंट किलर' म्हणतात. सुरुवातीला यामध्ये कोणतीही मोठी लक्षणे दिसत नाहीत. सर्वाइकल कॅन्सर हा एक प्रकारचा कर्करोग आहे जो गर्भाशयाच्या मुखातून, गर्भाशयाच्या खालच्या भागात सुरू होतो.
सर्वाइकल कॅन्सर हा प्रामुख्याने उच्च-जोखीम असलेल्या मानवी पॅपिलोमाव्हायरस (HPV) च्या सतत संसर्गामुळे होते. गर्भाशय ग्रीवा हा स्त्रीच्या खालच्या गर्भाशयाचा भाग आहे, ज्यामध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग विकसित होतो.
पॅपिलोमाव्हायरसच्या दीर्घकालीन संसर्गामुळे जवळजवळ सर्व गर्भाशयाच्या ग्रीवेचा कर्करोग होतो. HPV 16 आणि HPV 18 या दोन उच्च-जोखीम प्रकारांमुळे जगभरातील 70 टक्के सर्वाइकल कॅन्सर होतो.
पॅपिलोमाव्हायरसच्या विरुद्ध लसीकरण आणि नियमित चाचणी करुन हा रोग टाळू शकतो. याशिवाय गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी लसीकरण आवश्यक आहे.