आपल्याकडे एखाद्याने कोणच्या कानाखाली मारली तर मोठा वाद होऊ शकतो.
पण कानाखाली खाण्याचेही फायदे असतील, असं कोणी सांगितलं तर?
स्लॅप थेरेपी एक अनोखी टेक्निक आहे. ज्यामध्ये चेहऱ्यावर हलक्या चापट्या मारल्या जातात.
त्वचा उजळण्यासाठी आणि तरुण दिसण्यासाठी ही पद्धत अवलंबली जाते.
चेहऱ्यावर हलक्या कानाखाली दिल्या जातात, तेव्हा रक्त प्रवाह सुधारतो. ज्याने त्वचेला नवे जीवन मिळते.
हलक्या चापट्या मारल्याने त्वचा मुलायम आणि तजेलवान बनते.
यामुळे त्वचेतील छिद्र खुलतात आणि डाग कमी होतात. याने त्वचा चांगली बनते.
याने मांसपेशी अॅक्टीव्ह होतात. रक्त प्रवाह वेगाने होतो.
यामुळे त्वचेचा दर्जा सुधारतो. चेहरा आणखी उजळतो.
स्लॅप थेरपीने चेहऱ्यावर लावलेल्या क्रीमचा किंवा सीरमचा प्रभाव जास्त दिसतो.
स्लॅप थेरपीने त्वचेच्या आत जमलेले टॉक्सिन बाहेर निघते. याने त्वचेचे आरोग्य सुधारते.
स्लॅप थेरपीमध्ये हलक्या हाताने 50 चापट्या मारायच्या असतात. तुमची त्वचा सेंसेटिव्ह असेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.