चालणं-फिरणं आपल्या आरोग्यासाठी लाभदायी आहे, हे आपणासर्वांना माहिती आहे.
पण रात्री जेवणानंतरच्या शतपावलीचा तुमच्या शरीराला किती फायदा होतो तुम्हाला माहिती आहे का?
चांगल्या झोपेसाठी शतपावली करण्याचे फायदे जाणून घेऊया.
रात्री जेवणाच्या 2 तासानंतर शतपावली करावी.
झोपण्याआधी शतपावली केल्याने शरीराचे तापमाण कमी आणि डोकं शांत होतं. ज्यामुळे लवकर झोप येते.
शतपावली केल्याने ताण आणि चिंता कमी होते. तसेच डिप्रेशनचा धोकादेखील कमी होतो.
झोपण्याआधी शतपावली केल्याने कॅलेरीज बर्न होतात. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
नियमितपणे शतपावली केल्याने ह्रदय योग्यरीत्या कार्य करते म्हणून ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते.
आरोग्याची समस्या असेल तर शतपावली करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.