आंबा, दूध, दही यासह असे अनेक पदार्थ आहेत ज्यांचे सेवन कारल्यासह केल्यासह आरोग्यावर भयानक दुष्परिणाम होऊ शकतात.

वनिता कांबळे
Apr 29,2024

आंबा

चुकूनही आंबा कारल्यासह खाऊ नये. दोन्ही गोष्टी पचायला वेळ लागत असल्याने एकत्र खाल्ल्यास आरोग्य बिघडू शकते.

दही

कारल्याच्या भाजीसोबत दह्याचे सेवन केल्यास त्वचेवर पुरळ उठण्याची समस्या होऊ शकते.

दूध

कारल्याची भाजी खाल्ल्यानंतर दूध प्यायल्याने बद्धकोष्ठता, वेदना आणि पोटात जळजळ होण्याचा त्रास होऊ शकतो.

भेंडी

भेंडी आणि कारल्याची भाजी कधीच एकत्र खाऊ नये. यामुळे अपचन होऊ शकते.

मुळा

भेंडी प्रमाणाचे कारल्यासह मुळा खाणे आरोग्यासाठी त्रासदायक ठरु शकते. यामुळे आम्लपित्तची समस्या निर्माण होवू शकते.


कारले खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायेदीशीर आहे. मात्र, कारले खाताना काही गोष्टींची खबरदारी घेणे गरजेचे आहे.

VIEW ALL

Read Next Story