नवीन वर्षात अनेकांना शाकाहारी राहण्याचा विचार केलाय. पण अशावेळी शरीरातील पोषणयुक्त पदार्थ कमी होणार नाहीत, हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे.
नॉनव्हेज खाणाऱ्या व्यक्तीला प्रोटीन मिळत असते. पण मांसाहार खाणे बंद केल्यावर प्रोटीन कसे मिळवाल
भाज्या आणि फळांमध्ये प्रथिनांसह फायबर, जीवनसत्त्वे, खनिजे आणि कमी कॅलरी प्रदान करतात. त्यामुळे ते चिकन-मटणापेक्षा चांगले मानले जाऊ शकते.
चवळी, राजमा आणि सोयाबीन यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आहे. यासोबतच फायबर, हेल्दी कार्ब्स, सोडियम मोठ्या प्रमाणात आहे
जर तुम्ही दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ खात नसाल तर टेम्पेह आणि टोफू खा. हे सोयाबीनपासून तयार केले जाते आणि चांगल्या प्रमाणात ताकद पोषक पुरवते.
हिरवा किंवा ओल्या पावट्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते. यामुळे हाडे मजबूत होतात.
भाज्यंप्रमाणेच बदाम या सुक्यामेव्यातही भरपूर प्रमाणात प्रोटीन असते. तुमची त्वचा देखील यामुळे तजेलदार होते.
उच्च प्रथिनयुक्त धान्य आहे, जे दलिया आणि खिचडी बनवून खाऊ शकते. वजन कमी करण्यासाठी हे खूप आवडते.