मसूर डाळीमध्ये भरपूर फायबर असते. यातून पचनसंस्थेला मदत मिळते, सोबत कर्करोगोचा धोकाही कमी होतो.
पनीरमध्ये प्रोटीनचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळते.शरीरात रक्ताची कमतरता असल्यास पनीर भरुन काढण्याचे काम करते.
चणे हे आरोग्यासाठी लाभदायक मानले जातात. चणे हे प्रथिनांचा उत्तम स्त्रोत आहेत असे म्हटले जाते.
मोड आलेली कडधान्ये चरबी कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात. पोटाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत
अंड्यामधील ओमेगा-3 फॅटी अॅसिडचा चांगला स्त्रोत आहे. हे तुमचं हार्ट हेल्दी ठेवण्यासह तुमच्या डोळ्यांचीही काळजी घेईल.
पालक डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी पालकचे सेवन करावे.
मटरमध्ये एंटी-कोलेस्ट्रॉल गुण असल्याने रक्तदाब नियंत्रित होतो. तुम्हाला वजन कमी करायचे असल्यास मटरचे सेवन करा.
राजगिरा म्हणजे (जरी) आरोग्यदायी अन्न म्हणून लोकप्रिय आहे. हे प्राचीन धान्य हजारो वर्षांपासून जगाच्या काही भागांमध्ये आहाराचे मुख्य भाग आहे.
आहारात बदाम,काजू ,पिस्ता यांचा समावेश केल्यास शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते.तसेच आपल्या शरीराला मोठ्या प्रमाणात ऊर्जा मिळते.
सोयाबीन प्रोटीनचा चांगला स्रोत म्हणून ओळखला जातो.सोयाबीनचे सेवन केल्यास वजन कमी होते.शिवाय कर्करोगाचा धोका देखील कमी होतो.