भारतात TV चा इतिहास दूरदर्शनपासून सुरू होतो. 15 सप्टेंबर 1959 ला दूरदर्शन ची सुरुवात झाली होती.
त्या वेळी दूरदर्शनचे नाव 'टेलिविजन इंडिया' ठेवण्यात आले होते. आठवड्यातून ३ दिवस अर्धा तास प्रसरण त्यावर होत असे.
दूरदर्शनवर पहिल्यांदा 1984 साली 'हम लोग' ही पहिली मालिका प्रसारित झाली होती.
दिग्दर्शक पी. कुमार वासुदेव यांनी दिग्दर्शित केलेली ही मालिका एका मिडल क्लास कुटुंबाच्या कथेवर आधारित होती.
२५ मिनिटाच्या या मालिकेला पाहण्यासाठी प्रेक्षक आतुरतेने वाट पहायचे. 'हम लोग' त्यावेळची सर्वाधिक चालणारी मालिका होती.
'हम लोग' नंतर दूरदर्शनवर 'फौजी', 'भारत एक खोज', 'वागळे की दुनिया', 'दिल दरिया' सारख्या मालिका प्रसारित झाल्या.
रामायण आणि महाभारत सारख्या मालिकांमुळे दूरदर्शन जनमानसात जाऊन पोहचला.