अभिनेता इम्रान हाश्मी हा बॉलिवूडमध्ये 'सिरिअल किसर' म्हणून ओळखला जातो.
मात्र 'टायगर 3' चित्रपटामधून इम्रान चक्क व्हिलनच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. त्याच्या या भूमिकेचं कौतुकही होत आहे.
याचसंदर्भात 'इंडियन एक्सप्रेस'ला दिलेल्या मुलाखतीत इम्रानने त्याला दिलेल्या 'सिरिअल किसर' टॅगबद्दल भाष्य केलं आहे.
"मी मुख्य अभिनेता म्हणून चित्रपटसृष्टीमधील माझा प्रवास सुरु केला नाही. मी फार वेगळ्या भूमिका साकारायचो," असं इम्रान म्हणाला.
"सुरुवातीला मला फार कमर्शिएल व्हॅल्यू नव्हती. मात्र बॉक्स ऑफिसवर चित्रपट चालू लागल्यानंतर दिवस पालटले," असंही इम्रानने सांगितलं.
इम्रानने पुढे बोलताना, "एक कलाकारमधून तुम्ही जेव्हा प्रमुख भूमिका साकारता तेव्हा तुम्ही त्या कॅरेक्टरमध्ये किंवा हिरोमध्ये अडकून पडता," असंही म्हटलं.
"माझ्याबद्दल असं झालं आहे. तुम्ही त्याला कोणत्याही नावाने हाक मारा पण ते (सिरिअल किसर हे नाव) फारच विचित्र आहे," असं इम्रान म्हणाला.
"खरं तर मला त्या नावाने (सिरिअल किसर म्हणून) ओळखलं जाणं हा एक जोक आहे. पण लोकांनी ते विशेषण माझ्याशी जोडून टाकलं," असंही इम्रानने म्हटलं.
"पत्रकारांनीही याचा वापर केला. अर्थात याचा मला फायदा झाला नाही असं नाही. ते सर्व चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगले चालले," असं इम्रानने प्रांजळपणे मान्य केलं.