Samantha Ruth Prabhu : समंथा रुथ प्रभू तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून कायमच खासगी आयुष्याती घडामोडी चाहत्यांपर्यंत आणत असते.
प्रेक्षकांच्या मानावर राज्य करणाऱ्या याच समंथानं नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत.
विविध ठिकाणांना भेट देणारी ही समंथा सध्या पोहोचलीये दुबईला. आता दुबई म्हटलं की तिथे असणाऱ्या वातावरणाची गोष्ट वेगळ्यानं सांगण्याची गरज नाही.
दुबईच्या याच रखरखाटात समंथानं गुलाबी रंगाचं ब्रालेट आणि फ्लेअर्ड गुलाबी रंगाच्या साडीला पसंती दिली.
स्पगेटी स्ट्रॅपचा ब्रालेट, गळ्यासरशी असणारा नेकलेस आणि सेमी बॉब हेअरकट असा असणारा तिचा लूक सर्वांना घायाळ करून गेला.
समंथाचा हा लूक पाहिल्यानंतर तिनं पुन्हा एकदा आपलं कमालीचं स्टाईल स्टेटमेंट सर्वांपुढे आणलं.
(सर्व छायाचित्र- समंथा रुथ प्रभू/ इन्स्टाग्राम)