दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत वेगवेगळ्या धर्माच्या अभिनेत्री आपल्याला आनंदानं काम करत असल्याचे पाहायला मिळते.
या क्षेत्रात अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी त्यांचं धर्मपरिवर्तन केलं आहे.
दाक्षिणात्य अभिनेत्री नयनताराचा जन्म हा मल्याळी सीरियाई ईसाई कुटुंबात झाला होता. नयनतारानं कथितपणे 7 ऑगस्ट 2011 मध्ये चेन्नईत आर्य समाज मंदिरात हिंदू धर्म स्विकारल्याचे म्हटले जाते.
अभिनेता सूर्याची पत्नी आणि अभिनेत्री ज्योतिकाचं नाव सदाना होतं. तिचे वडील पंजाबचे आणि आई मुस्लिम आहेत. तर ज्योतिकाची सगळ्या धर्मांवर श्रद्धा आहे.
नगमा यांनी 2007 मध्ये ख्रिश्चन धर्म स्विकारला होता. तर नगमा यांचं खरं नाव नंदिता अरविंद मोरारजी होते.
मोनिकाचा जन्म मुस्लिम आई आणि हिंदू वडीलांच्या घरी झाला होता. वडील हिंदू असतानाही त्यांनी मुस्लिम धर्म स्विकारून एम.जी.रहीमा असं ठेवलं.
खुशबू सुंदरचा जन्म 29 सप्टेंबर 1970 रोजी एका मुस्लिम कुटुंबात झाला. त्याचं खरं नाव नखत खान असं होतं. मात्र, सुंदर सी यांच्याशी लग्न करण्यासाठी हिंदू धर्म स्वीकारला. (All Photo Credit : Social Media)