एकीकडे लोकांच्या प्रतिक्रियांची मजा घेत असल्याचं सांगताना आकाशने, "प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच आम्ही आज इथपर्यंत पोहोचलो आहोत," असंही सांगितलं.
सोशल मीडियावरील फोटोंबद्दलही आकाशने प्रतिक्रिया देताना, "आम्ही फोटो पोस्ट करतो आणि त्यानंतर त्यावर लोकांच्या मजेदार प्रतिक्रिया येतात. आम्ही या प्रतिक्रियांचा आनंद घेतो," असं सांगितलं.
रिंकूबरोबरच्या नात्याबद्दलही आकाशने भाष्य केलं आहे. "आम्ही दोघेही खूप चांगले मित्र आहोत. याहून अधिक आम्हाला दोघांमध्ये काहीच नाही," असं आकाशने स्पष्टपणे सांगितलं आहे.
आकाशने रिंकूला डेट करत असल्याच्या बातम्या खोट्या असल्याचं म्हटलं आहे. "आम्ही दोघे डेट करत असल्याच्या बातम्या फक्त अफवा आहेत," असं आकाशने स्पष्ट केलं आहे.
मात्र मागील काही काळापासून सुरु असलेल्या या चर्चांवर आकाशने थेटपणे भाष्य करत माहिती दिली आहे.
रिंकू आणि आकाश दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असून त्यांच्या काही फोटोंवरुन ते दोघेही एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
'सैराट'ला अनेक वर्ष झाली असली तरी आता पुन्हा एकदा या दोघांच्या रिलेशनशिपची चर्चा मनोरंजन सृष्टीमध्ये जोर धरु लागली आहे.
'सैराट'मुळे रिंकू आणि आकाश एकमेकांचे फार चांगले मित्र झाले आहेत. ते अनेकदा वेगवगेळ्या कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसून येतात.
आर्चीची भूमिका साकारणारी रिंकू राजगुरु आणि परशा ही भूमिका साकारणाऱ्या आकाश ठोसरला 'सैराट'ने तुफान लोकप्रियता मिळवून दिली.
'सैराट' चित्रपटामधून रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर महाराष्ट्रातील घराघरात पोहोचले.