Swapnil Ghangale
Dec 12,2023

टॉलीवूडमधील सुपरस्टार

टॉलीवूडमधील सुपरस्टार महेश बाबूची वेगळी ओळख करुन देण्याची गरज नाही.

संपूर्ण भारतामध्ये लोकप्रिय

केवळ टॉलीवूडच नाही तर हिंदी डब्ड चित्रपटांमुळे महेश बाबू संपूर्ण भारतामध्ये लोकप्रिय आहे.

आघाडीचा अभिनेता

दाक्षिणात्या चित्रपटसृष्टीमधील आघाडीचा अभिनेता म्हणून महेश बाबूकडे पाहिलं जातं.

6 मोठे चित्रपट नाकारले

महेश बाबूकडे चित्रपटांची कमतरता नाही. मात्र महेशबाबूने आतापर्यंत 6 मोठे चित्रपट नाकारले आहेत जे सुपरहीट ठरले आहेत.

महेश बाबूने कोणते चित्रपट नेमके का रिजेक्ट केले हे पाहूयात...

'ॲनिमल' झालेला ऑफर

उपलब्ध माहितीनुसार रणबीर कपूरने प्रमुख भूमिका साकारलेला 'ॲनिमल' आधी महेश बाबूला ऑफर करण्यात आला होता.

'ॲनिमल' नाकारला

मात्र महेश बाबूला हे कॅरेक्टर फारसं आवडलं नाही. त्यामुळेच त्याने 'ॲनिमल'ला नकार दिला.

'पुष्पा' महेश बाबूला झालेला ऑफर

अल्लू अर्जूनच्या करिअरमधील सर्वोत्तम चित्रपट म्हणून 'पुष्पा' चित्रपट ओळखला जातो. हा चित्रपटही महेश बाबूला आधी ऑफर झाला होता.

अल्लू अर्जूनने साकारलेली भूमिका पटली नाही कारण...

अल्लू अर्जूनने साकारलेली भूमिका स्क्रीप्ट वाचली तेव्हा महेश बाबूला ही भूमिका फारशी रुचली नाही. ज्यापद्धतीने भूमिकेसाठी बदल अपेक्षित होते ते महेश बाबूला न पटल्याने त्या चित्रपट नाकारला.

'गजनी'ही नाकारला

ए. आर. मुर्गुदास यांनी दिग्दर्शित केलेल्या मूळ 'गजनी' चित्रपटामधील प्रमुख भूमिका महेश बाबूला ऑफर करण्यात आली होती. ती त्याने नाकारली.

हिंदीत झाला रिमेक

नंतर हाच 'गजनी' चित्रपट हिंदीमध्ये तयार करुन प्रदर्शित केला तेव्हा तो ब्लॉकबस्टर ठरला. महेश बाबूला चित्रपट नाकारण्याचा नक्कीच फटका बसला.

शारीरिक बदल नको म्हणून दिला नकार

प्रचंड गाजलेला 'लीडर' चित्रपटही महेश बाबूला ऑफर करण्यात आलेला. मात्र भूमिकासाठी करावे लागणारे शारीरिक बदल लक्षात घेत त्याने चित्रपट नाकारला.

नंतर ही भूमिका कोणी साकारली?

'लीडर' चित्रपटतील प्रमुख भूमिका नंतर राणा डुगुबत्तीने साकारली. या चित्रपटाने चांगली कामगिरी केली.

'थ्री इडियट्स'चा रिमेकही नाकारला

'थ्री इडियट्स'चा दाक्षिणात्य रिमेक असलेला 'नाणबाण' चित्रपट महेश बाबूला ऑफर करण्यात आला होता.

चित्रपट नाकारण्याचं कारण...

आधीच गाजलेला चित्रपट दक्षिणत फारसा चालणार नाही असा अंदाज महेश बाबूने व्यक्त केला होता.

विजयने साकारली भूमिका

नंतर या चित्रपटातील प्रमूख भूमिका थालापती विजयने साकारली.

'वर्षाम' ही नाकारला

महेश बाबूने 'वर्षाम' नावाचा चित्रपटही नाकारला होता. या चित्रपटाची कथा अनिल कपूरच्या 'तेजाब' चित्रपटावर आधारित होती.

कोणी साकारली भूमिका?

वर्षाम' मध्ये प्रमुख भूमिका नंतर प्रभासने साकारली.

VIEW ALL

Read Next Story