प्रियांका चोप्राचा आज 10 जुलै रोजी वाढदिवस असून ती आज तिचा 41 वा वाढदिवस साजरा करत आहे.
प्रियांकानं फक्त बॉलिवूडमध्ये नाही तर हॉलिवूडमध्ये देखील स्वत: ची एक ओळख निर्माण केली आहे.
प्रियांका फक्त एक उत्तम अभिनेत्री नाही तर त्यासोबत एक उत्तम बिझनेस वूमन आहे.
GQ नं दिलेल्या वृत्तानुसार प्रियांका चोप्राची एकूण संपत्ती ही 620 कोटी आहे.
प्रियांका ही फक्त चित्रपट नाही तर त्यासोबतच ब्रॅंड एन्डॉर्समेंटमधून देखील पैसे कमावते. तिनं काही बिझनेसमध्ये देखील इन्व्हेस्टमेंट केली आहे.
प्रियांकाचं प्रोडक्शन हाऊस असून पर्पल पेबल पिक्चर्स असं त्याचं नाव आहे. तिनं वेंटिलेटर, द स्काय इज पिंक या चित्रपटांची निर्मिती केली आहे. तर तिचे हे प्रोडक्शन हाऊस रीजनल चित्रपटांना प्रोत्साहन देतं.
प्रियांकानं 2021 मध्ये न्युयॉर्कमध्ये सोना नावानं इंडियन रेस्टॉरंट देखील सुरु केलं आहे.
प्रियांका ही अनेक ब्रॅन्डचं एन्डॉर्समेंट करते. CAKnowledge नुसार, पेप्सी, गार्नियर, बंबलसोबत ती अनेक ब्रॅंड्सकडून एन्डॉर्समेंटसाठी 5 कोटी रुपये मानधन घेते.
प्रियांकाचं स्वत: हेअर केअर ब्रॅंड असून Anamaly असं त्याचं नाव आहे. रिपोर्ट्सनुसार, 2022 मध्ये प्रियांकानं यातून 4 हजार 300 कोटी रुपयांची कमाई केली.
प्रियांका ही एका चित्रपटासाठी 15 कोटी रुपये मानधन म्हणून घेत असं रिपोर्ट्समध्ये म्हटलं जाते. (All Photo Credit : Priyanka Chopra Instagram)