'पंचायत' या वेबसीरिजने ओटीटीवर धुमाकूळ घातला असून प्राईमवर याचा तिसरा भाग रिलीज झाला आहे.
तिसऱ्या भागामुळंही सचिव जी म्हणजेच अभिनेता जितेंद्र कुमार हा चर्चेत आला. त्याने साकारलेल्या भुमिकेला प्रेक्षकांनी पसंती दिली.
प्राईमवर झालेल्या 'परमनंट रुममेट्स' (Permanent Roommates) या वेबसीरिजमधून त्याने ओटीटी विश्वात अभिनयाला सुरुवात केली.
TVF Pitchers या वेबसिरीजमध्येही जितेंद्रने त्याच्या अभिनयाची छाप सोडली. Zee5 वर याचे सगळे एपिसोड पाहता येतील.
अभिनेता जितेंद्र कुमारने 'Gone kesh' आणि शुभ मंगल ज्यादा सावधान या सिनेमातही जितेंद्रने काम केलं.
'पंचायत'प्रमाणं 'कोटा फॅक्ट्री' (Kota Factory) ही त्याची आणखी एक गाजलेली सीरिज. या सीरिजचा तिसरा सीझन लवकरच नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. त्यात तो जीतू भैय्या ही भूमिका साकारणार आहे.
जितेंद्रनने चमनबहार, जादूगर आणि ड्राय डे या सिनेमातून त्याने काम केलं असलं तरी त्याला अभिनेता म्हणून ओळख ओटीटीमुळे मिळाली.
ओटीटीवर पंचायतच्या सगळ्याच सिझनला प्रेक्षकांनी तितकीच पसंती दर्शवली.